कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षपदी वालचंद संचेती यांची फेर निवड

पुणे, ता. 11 : कॅम्प एज्युकेशन सोसायटी कार्यकारी मंडळ सन २०२४-२५ या वर्षाकरीता कार्याध्यक्षपदी वालचंद संचेती यांची फेर निवड
झाली. तसेच उपकार्याध्यक्षपदी उदय पुंडे, मानद सचिवपदी बाबुराव जवळेकर, खजिनदारपदी सुभाष अगरवाल व कार्यकारी सचिवपदी प्रशांत वाघ यांची एकमताने निवड करण्यात आली.
कॅम्प एज्युकेशन सोसायटी गेली १४० वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असुन पुण्याच्या पूर्व भागात गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था आहे. आज संस्थेच्या ४० विभागामधून पूर्व-प्राथमिकपासून ते पदव्युत्तर अभ्यासकमापर्यंत मराठी व इंग्रजी माध्यमातून सुमारे १५००० पेक्षा जास्त विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. अनेक वर्षापासुन एस.एस.सी. व एच. एस. सी. बोर्ड परीक्षेत संस्थेच्या इंग्रजी व मराठी माध्यम शाळांचा निकाल १०० टक्के लागत आहे. संस्थेतर्फे मु. पो.कोरेगांव भीमा येथे इंग्रजी माध्यम शाळेची मोठी इमारत उभारण्याचे काम चालु आहे. अशी माहिती वालचंद संचेती यांनी दिली.
कार्याध्यक्षपदी फेर निवड झालेले वालचंद संचेती संस्थेचे माजी विद्यार्थी असुन गेली ५१ वर्षे पदाधिकारी म्हणुन कार्यकारी मंडळावर ते कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रात नेहमीच वेगवेगळे सकारात्मक बदल करून विद्यार्थ्यांना अद्ययावत व आधुनिक शिक्षण देण्यास प्रयत्नशील असतात. उदय पुंडे, बाबुराव जवळेकर व सुभाष अगरवाल हे देखील गेली अनेक वर्षे कार्यकारी मंडळावर कार्यरत आहेत. सर्व नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचे कार्यकारी मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.