डिवाइन जैन ग्रुपच्या वतीने दिवाळी भेट

0
डिवाइन जैन ग्रुपच्या वतीने दिवाळी भेट

पुणे रेल्वे स्टेशनला भेट म्हणून बॅरिकेड्स दिले

पुणे, ता. 31 : संपूर्ण भारतातील मोठा असा दिवाळी सण. साहजिकच पुण्याहून आपपल्या गावी जाणारांची संख्या मोठी. अश्या वेळी पुणे रेल्वे स्टेशनच्या फलाटावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गर्दी नियंत्रित करून होणारी छोटी मोठी मध्ये दुर्घटना टाळण्यासाठी बॅरिकेड्सचा उपयोग होतो. म्हणून दिवाळीच्या या पवित्र प्रसंगी डिवाइन जैन ग्रुपने सामाजिक कार्य म्हणून पुणे रेल्वे स्टेशनवर भारतीय रेल्वेचे मदनलाल मीणा (IRTS) यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमांतर्गत प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्टेशनवर बॅरिकेड्सचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश प्रवाशांची सुविधा करणे हा होता. असे मनोगत यावेळी ग्रुपचे अध्यक्ष संकेत शहा यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी ग्रुपचे इतर प्रमुख सदस्य रोनक शहा, मेहुल शहा (कॉसमॉस ग्रुप), अमित जनजानी, प्रशांत कुमार, तनीष जैन हे उपस्थिती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed