दिवाळी पाडव्यानिमित्त भक्ती संगीताचा सुरेल कार्यक्रम

पंडित आनंद भीमसेन जोशी यांच्या “संतवाणी” कार्यक्रमाचे आयोजन
धायरी, ता. 08: धायरी येथे गणेश नगर मध्ये गुरूप्रसाद वास्तू योजना सोसायटीने दिवाळी पाडव्यानिमित्त भारतरत्न स्वर्गीय स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र पंडित आनंद भीमसेन जोशी यांचा “संतवाणी” हा कार्यक्रम आयोजित केला होता.
भारतरत्न स्वर्गीय स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या अनेक गाण्यांना उजाळा देण्यात आला. भक्ती संगीताचा सुरेल कार्यक्रम अतिशय उत्साहाच्या वातावरणात साजरा झाला. रसिकांनी कार्यक्रमास टाळयाचा गजरात उत्स्पुर्तपणे प्रतिसाद देत आनंद व्यक्त केला.
स्थानिक लोकप्रतिनिधींची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. आमदार भिमराव तापकीर, माजी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, खडकवासला विधानसभा उमेदवार सचिन दोडके, स्वाती पोकळे, सायलीताई वांजळे-शिंदे, माजी नगरसेवक बाळासाहेब नवले, किशोर पोकळे, गंगाधर भडावळे, सारंग नवले आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन महादेव म्हस्के, नितीन भालेकर, गजानन सोनवणे, शंकर म्हस्के, बाळासाहेब वांद्रे, विजय चव्हाण, महेश निसळ, विनोद सांभारे, दिलीप थोपटे, सुभाष आळीमोरे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाशिलकर यांनी केले. तसेच गुरूप्रसाद वास्तू योजना सोसायटीतीच्या वतीने अनुराज सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.