श्रमवीर मित्र मंडळाचा गणेश जयंती सोहळा उत्साहात संपन्न

गणेश जयंती निमित्त महाप्रसाद भंडाराचे आयोजन
पुणे- महात्मा फुले पेठ येथील श्रमवीर मित्र मंडळाचे यंदाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे या वर्षीचा गणेश जयंती सोहळा ‘खास’ होता. तीन दिवसांच्या या समारंभात गणेश जयंतीच्या दिवशी होम हवन व गणेश पूजन करण्यात आले. तसेच दुसऱ्या दिवशी बिल्वेश्वर भजनी मंडळांचा भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी संध्याकाळी गणपतीची महाआरती झाल्यावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळाने गणपती भोवती रोषणाईची सजावट देखील केली होती. कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मंडळाने बालचमूसाठी खेळ ठेवले होते. सदर कार्यक्रमाला कसबा विधानसभा आमदार हेमंत रासने, माजी नगरसेविका आरती कोंढरे, भाजप कसबा मतदार संघ अध्यक्ष राजेंद्र काकडे, नामदेव माळवदे, उमेश चव्हाण, श्रीकांत चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करताना हेमंत रासने म्हणाले कि, ‘पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे योग्य नियोजन हेच धार्मिक कार्यक्रमांचे यश असते. यापुढे देखील मंडळाने विविध कार्यक्रमांचे असेच आयोजन करावे.’ भागातील माजी नगरसेविका आरती कोंढरे यांनी सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मंडळाला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष शुभम पवार, उपाध्यक्ष सारंग वहीकर, कार्याध्यक्ष विनायक कचरे, उत्सव प्रमुख यश पोरे, विकी मायने, ओंकार पवार, संदेश पवार, गौतम परदेशी, निरंकार गायकवाड, आकाश शिंदे, प्रतिक कुलाळ, सौरभ पवार, कौस्तुभ पवार, सिद्धार्थ पवार व इतर अनेक कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला होता. तसेच महिला मंडळाचा देखील विशेष सहभाग होता. यावेळी महिलांमध्ये योगिता वाफगांवकर, प्रमिला मायने, तेजस्विनी पानकर, वर्षा पवार, पूनम परदेशी, शशिकला पवार, मनिषा कुलाळ, प्रणवती जव्हेरी उपस्थित होत्या.
यावेळी अक्षय मायने यांनी मंडळाच्या सर्व वर्गणीदार आणि हितचिंतकांचे आभार मानले.