जैन आचार्य यांच्या पुस्तकांची “गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स” मध्ये घेतली नोंद

0
जैन आचार्य यांच्या पुस्तकांची “गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स” मध्ये घेतली नोंद

पूज्य जैनाचार्य नी स्थापित केला एक नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

पुणे, ता.२१: पुस्तक महोत्सवात अध्यात्मिक गुरु, प्रखर लेखक, पद्मभूषण पुरस्कार विभूषित असे जैनाचार्य श्री रत्नसुंदर सुरीश्वरजी म.सा. यांच्या लेखणीतून साकारलेल्या ४८१ पुस्तके महोत्सवात आहेत. एकाच लेखकाने इतकी पुस्तकं लिहल्याच्या कार्यामुळे त्यांना “गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स” कडून त्याची नोंद घेण्यात आली आहे. मागील ५८ वर्षापासून त्यांनी अध्यात्म, संस्कृती रक्षा आणि मानव सेवा करण्यासाठी अपूर्व योगदान दिले आहे. त्यांनी अनेक विषयांवर लिखाण केले आहे. त्यामध्ये कुटुंबाची एकता, सामाजिक जीवन, विचारांची क्रांती, मानसिक शांती आणि समाधान, प्रेम, आनंद, आदर्श जीवन, भारतीय संस्कृती, जीवनाची मूल्य, मानव नैतिकता इ. आणि असे अनेक विषय सामावलेले आहेत.
त्यांनी आपल्या लेखणीतून संपूर्ण जगाला जीवन व्यवहारांचे मार्गदर्शन केले आहे. आजपर्यंत त्यांनी लिहलेल्या पुस्तकांच्या एक करोडपेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत. दहावी पर्यंत शिकलेल्या आचार्यांनी वयाच्या एकोणिसाव्या वर्षी जैन साधू जीवन मार्गाचे अवलंबन केले. त्यांचे गुरु जैनाचार्य भुवनभानुसुरीजी यांच्या आशीर्वादाने त्यांनी लिहायला सुरुवात केली. लिखाणासोबतच ते प्रवचन देण्याचे काम देखील करतात. त्यांनी आजपर्यंत पंधरा हजार तासांपेक्षा अधिक वेळ व्याख्यान दिले आहे. पाच हजारांहून अधिक पुस्तकांची समीक्षा आणि प्रस्तावना लिहली आहे. त्यांचे लेखन वाचून व व्याख्यान ऐकून अनेकांनी आपल्या जीवनात सकारात्मक बदल करून घेऊन समाधानी जीवन जगत आहेत.
त्यांची दूरदृष्टी पाहून भारत योजना आयोग यांनी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि विचारांची देवाण घेवाण करण्याच्या दृष्टीने निमंत्रित केले होते. त्यांच्या अमूल्य आणि निस्वार्थी सामाजीक योगदानासाठी भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ देऊन सन्मानित केले आहे.
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक प्रचाराच्या धामधुमीत देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जैन आचार्य रत्नसुंदर सुरीश्वरजी म.सा. यांचे धुळे मध्ये दर्शन व आशीर्वाद घेतले होते. तसेच राष्ट्रातील अनेक विषयावर मार्मिक मार्गदर्शन घेतले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed