कोल्हारच्या जैन श्रावक संघाचा बहुमूल्य “समाजशिल्पी पुरस्कार” आनंद दरबारचे बाळासाहेब धोका यांना प्रदान.

0
कोल्हारच्या जैन श्रावक संघाचा बहुमूल्य “समाजशिल्पी पुरस्कार” आनंद दरबारचे बाळासाहेब धोका यांना प्रदान.

पुणे, ता. २५ : श्री वर्धमान स्थानक जैन श्रावक संघ, कोल्हार भगवती येथे “महोत्सवाचे” आयोजन जैन धर्मगुरू प.पू. श्री. चंदनबालाजी म.सा., प.पू. श्री. पद्मावतीजी म.सा. प पू कौशल्यरत्न श्री जी माँ सा यांच्या सानिध्यात पुरस्कार समारोह करण्यात आले ज्येष्ठ उद्योजक प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांना ‘समाजशिल्पी’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी अजित कुंकुलोळ यांना समाज शिरोमणी, गणेश निबे यांना युवा समाज गौरव, संजय कोठारी यांना समाजरत्न आणि करन रांका यांना युवा समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
समाजामध्ये जसे विविध संप्रदाय आहेत. त्याप्रमाणेच जैन समाजामध्ये देखील अनेक संप्रदाय आहेत. बाळासाहेब धोका हे असे व्यक्तीमत्व आहे की जे सर्व पंथांना सोबत घेऊन समाजकार्य करत आहेत. भगवान महावीर स्वामींचे जेवढे अनुयायी, जेवढे साधू संत समाजामध्ये आहेत तेवढ्यांची सेवा करत असताना एकसंघ फुलांच्या माळेप्रमाणे गुंफण्याचे प्रयत्न बाळासाहेब करत असतात. त्यांच्या या कार्याचा गुणगौरव म्हणून त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. असे यावेळी प्रकाश धारीवाल म्हणाले.

पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी प्रसंगी श्री जैन श्रावक संघ, कोल्हार संघाचे अध्यक्ष नंदकुमार भटेवरा, उपाध्यक्ष महेंद्र कुंकुलोळ, सचिव सुधीर चोरडिया, प्रमुख उपस्थिती रमणलाल लुंकड, पारस मोदी, राजेंद्र पिपाडा,अशोक पगारिया, सुनील बाफना, दिलीप संचेती, भरत चोरडिया, दिलीप राका, ललित मोदी, सागर सांकला, विलास कोठेचा यांच्यासह संघाचे सर्व पदाधिकारी, महिला मंडळ, युवक मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed