पुण्यातील ‘महा सिक्युरटेक एक्सपो’ ला उत्तम प्रतिसाद

0
पुण्यातील ‘महा सिक्युरटेक एक्सपो’ ला उत्तम प्रतिसाद

महाराष्ट्र जागृती

पुणे, ता. १९: पुण्यात नुकतेच ‘महा सिक्युरटेक एक्सपो’ चे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसाच्या या ‘महा एक्सपो’ मध्ये जागतिक दर्जाची अत्याधुनिक स्वरूपातील सुरक्षा यंत्रणा, सीसीटीव्ही, एआय आणि संगणक आधारित नवीन सुरक्षा उपकरणे पाहायला मिळाली. या अनोख्या प्रदर्शनातून अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, सीसीटीव्ही कशा प्रकारे काम करतात याची माहिती ग्राहक, व्यावसायिक त्याच बरोबर सरकारी यंत्रणा यांना झाली. प्रदर्शनाला महाराष्टातील विविध जिल्ह्यातून तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेकांनी भेट दिली. 

आर ईशा सिक्योरटेक प्रा.लि. या कंपनीचे ‘सीईओ’ राहुल मुथा यांनी या भव्य प्रदर्शनाचे आयोजन केले होते. कॅबिनेट मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांनी या प्रदर्शनास आवर्जून भेट दिली. एका छताखाली देशविदेशातील विविध कंपन्यांची आधुनिक सुरक्षा यंत्रणा आणि असंख्य प्रकारचे सीसीटीव्ही ग्राहकांना येथे बघायला मिळाले. देशविदेशातील तीस पेक्षा जास्त कंपन्या यात सहभागी झाल्या होत्या. 

उद्घाटन समारंभाला आर ईशा सिक्योरटेक प्रा. लि.च्या लक्ष्मीबाई मुथा, राहुल मुथा, सोनाली मुथा, हिकव्हिजन इंडियाचे अनिकेत छत्रे, राशि पेरिफेरल्सचे एमडी पवन सराफ, प्रमा इंडियाच्या सुप्रिया नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. ‘सीएमडीए’, ‘पीईईए’, ‘ईसीएएम’, या संस्थांचे प्रतिनिधी, मावळ असोसिएशन, पुण्यातील तपकीर गल्ली इलेक्ट्रॉनिक डीलर असोसिएशनचे सदस्य याप्रसंगी उपस्थित होते. ‘पीडब्ल्यूडी’ चे हितेश केजरीवाल, हवेली के उपमंडल अधिकारी डॉ. यशवंत माने हे मान्यवर देखील उपस्थित होते. 

अशा स्वरूपाचे आगळेवेगळे ‘महा एक्सपो’ प्रदर्शन पुण्यात प्रथमच आयोजित करण्यात आले होते. अशी माहिती आर ईशा चे राहुल मुथा यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed