शिरीष महाराज मोरे यांनी आयु्ष्य का संपवलं? 32 लाखांचं कर्ज नेमकं कशासाठी घेतलं? चार धक्कादायक कारणं समोर

चिठ्ठीत पैशांचा सगळा हिशोब दिला अन् मृत्यूला कवटाळलं; शिरीष महाराजांनी 32 लाखाचं कर्ज का घेतलं? सुन्न करणारी माहिती समोर!
संत तुकाराम महाराजांचे 11 वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आज (दि.5) देहूतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी रात्री (दि.5) ते जेवण केल्यानंतर झोपायला गेले. मात्र, सकाळी खोलीचे दार उघडलेले दिसेना. त्यामुळं दार तोडले असता त्यांनी उपरण्याच्या साह्यानं गळफास घेतल्याचं समोर आलं. आर्थिक विवंचनेतून हे पाऊल उचलल्याचं सुसाईड नोटमध्ये शिरीष महाराज मोरे यांनी नमूद केलं होतं. वीस दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. मात्र, त्यांच्या टोकाच्या निर्णयामुळे त्याच्या कुटुंबियास आत्पस्वकियांना मोठा धक्का बसलाय. दरम्यान, शिरीष महाराज मोरे यांनी कर्ज कशासाठी घेतलं होतं याची माहिती देखील समोर आलीये.
शिरीष महाराज मोरेंनी कर्ज कशासाठी घेतलं?
1. कोरोनाच्या आधी शिरीष महाराज मोरे व्यवसाय क्षेत्रात उतरले होते. कागदी पिशवी बनवणे अन् त्यावर छपाई करुन देण्याचा व्यवसाय सुरु केला. यासाठी त्यांनी कर्ज उचलले होते. मात्र कोरोनाच्या काळात हा व्यवसाय बंद पडला अन् महाराजांना पहिलं आर्थिक नुकसान झेलावं लागलं.
2. अडीच वर्षांपूर्वी हॉटेल क्षेत्रात उतरण्याचं ठरवलं. नादब्रह्म ईडलीची काही लाख रुपये मोजून फ्रेंचायजी घेतली. पिंपरी चिंचवड परिसरात हा नवा व्यवसाय सुरु केला, जो आज ही सुरु आहे. आधीचं कर्ज असताना पुन्हा या व्यवसायासाठी ही महाराजांनी कर्ज घेतलं.
3. काही महिन्यांपूर्वी एक मजली घर बनवलं, त्यासाठी ही लाखांमध्ये खर्च झाला.
4. अलीकडेच महाराजांनी चार चाकी गाडी ही घेतली, त्यासाठी ही कर्ज घ्यावं लागलं.
वारकरी संप्रदायावर दु:खाचा डोंगर, देहू संस्थानाच्या अध्यक्षांसह सदस्यांनी व्यक्त केल्या भावना
शिरीष महाराज मोरेंनी जगाचा निरोप घेताना, माझ्या मागे प्रत्येकाने दिलेलं कर्ज फेडावं. असं म्हणून कोणावर अन्याय होणार नाही, याची दक्षता ही घेतली. या मार्फत शिरीष महाराजांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली. मात्र त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली. असं म्हणत चुकीची चर्चा घडवण्यात येत असल्याचं मोरे कुटुंबियांचे म्हणणे आहे. अनेकजण किर्तनावर मोठे होत आहेत, मात्र शिरीष महाराजांनी आजवर मोफत किर्तनसेवा केलीये. फक्त यावेळी जरा गडबड झाली अन् दुःखाचा डोंगर वारकरी संप्रदायावर कोसळला. शिरीष महाराजांनी एकवेळ आवाज दिला असता तर अख्खा महाराष्ट्र मदतीला नक्कीच धावला असता. अशी खंत ही देहूकर व्यक्त करतायेत. शिरीष महाराजांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्यांचा आधार घेत, देहूरोड पोलीस पुढील तपास करत आहेत.