शिवतेज ग्रुपच्या वतीने वढू येथे दीपोत्सव

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांच्या समाधी स्थळी आकर्षक फुलांची सजावट
पुणे, ता. 31 : कसबा पेठ येथील शिवतेज ग्रुप ढोल ताशा पथक व दहीहंडी संघ यांच्या वतीने वढू बुद्रुक येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांच्या समाधी स्थळी ११११ दिवे लावून तसेच फुलांची आकर्षक सजावट करून दीपोत्सव साजरा करण्यात आला.
ज्यांच्यामुळे आपण आज दिवाळी साजरी करू शकतो. अश्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना प्रथम वंदन म्हणून आम्ही त्यांच्या समाधी स्थळी दीपोत्सव साजरा करण्याचे आयोजन केले. अतिशय प्रसन्न अश्या वातावरणात कार्यक्रम साजरा झाला. असे मनोगत शिवतेज ग्रुपच्या वतीने स्वरांग पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी ढोल ताशा पथक व दहीहंडी संघाचे प्रशांत कोळी, केदार वायचळ, अभिषेक नाईक, प्राजक्ता फरांदे, सानिका टोपे, सोनल जाधव, सलोनी झेंडे, वैष्णवी ढहाळे आणि वृंदा मळेकर उपस्थित होते.