सुशिलाबाई वीरकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा एक आगळावेगळा रौप्य महोत्सव सोहळा.

0
सुशिलाबाई वीरकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा एक आगळावेगळा रौप्य महोत्सव सोहळा.

जुन्या सोनेरी आठवणींना दिला उजाळा.
पुणे- आदर्श शिक्षण मंडळ, सौ. सुशिलाबाई वीरकर हायस्कूल शुक्रवार पेठ परिसरात असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्नेह मेळावा आयोजित केला होता.
ह्या स्नेह मेळाव्याचे वैशिष्ट म्हणजे ई. स. २००० मध्ये दहावीला असलेल्या विद्यार्थ्याच्या बॅचने २५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आगळावेगळा रौप्य महोत्सव सोहळ्याचे आयोजन केले होते.
याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सर्व आजी-माजी शिक्षक, मुख्याध्यापक तसेच सेवक वर्ग यांना खास आमंत्रित करून त्यांचा सन्मान केला. शाळेच्या बाहेरील आवारात खाऊ विकणाऱ्या मावशींचा सुद्धा या विद्यार्थ्यांकडून सन्मान करण्यात आला. त्यासोबतच सर्वांसाठी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत जुन्या आठवणींना दिला उजाळा दिला. आपण आता शाळेचा गणवेश घालू शकत नाही. तरीसुद्धा आपण तेच विद्यार्थी आहोत या भावनेतून शाळेबद्दल माहिती असलेला विशेष डिझाईनचा टी-शर्ट खास तयार करून घेऊन सर्व विद्यार्थ्यांनी ‘तोच’ टी-शर्ट परिधान केला होता.
शालेय जीवन सोडून पंचवीस वर्षे पूर्ण करणाऱ्या या माजी विद्यार्थ्यांनी आपणही शाळेचे काही देणे लागतो या हेतूने शाळेचे ऋण व्यक्त करण्याच्या भावनेतून या मेळाव्यात प्राथमिक शाळेसाठी वह्या आणि काही शैक्षणिक साहित्य, माध्यमिक शाळेसाठी एक स्क्रीन प्रोजेक्टर आणले होते. त्याचसोबतच शाळेचं रूप बदलून टाकणारी गोष्ट म्हणजे शाळेतील आतील व बाहेरील परिसराचे छान रंगकाम करून घेतले. खास लहान मुलांना आकर्षित होईल व इतर शैक्षणिक गोष्टी त्यातून कळतील अशा स्वरूपाचं काम आर्टिस्ट लोकांकडून करून घेतले.
या सर्व कामासाठी सहभागी माजी विद्यार्थ्यांनी स्वतः एकमेकांमध्ये वर्गणी जमा करून हे सर्व काम करून घेतले आहे.
शिक्षकवर्ग हा सगळा सोहळा पाहून भारावून गेले. यावेळी काही माजी शिक्षकांनी मार्गदर्शन देखील केले.
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
संदीप नागरे व केयुर कुलकर्णी या माजी विद्यार्थ्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed