प्लेटलेट डोनेट करणाऱ्या दोन तरुणांचा सत्कार

0
प्लेटलेट डोनेट करणाऱ्या दोन तरुणांचा सत्कार

महाराष्ट्र जागृती,

कोथरूड, ता. ०२: ज्ञानेश्वर पुरकर ७५ वेळा आणि योगेश हाके ४५ वेळा प्लेटलेट डोनेट करण्याचे सामाजिक कार्य केले आहे. दोघांचे वय वर्षे फक्त तीस. ह्या दोन तरुणांची सामाजिक कार्याची माहिती नाट्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सत्यजित धांडेकर यांना समजली आणि त्यांनी प्लेटलेट डोनेट करणाऱ्या तरुणांचा सत्कार समारंभ करण्याचे ठरविले. मंगळवारी (ता. १) हा सत्कार समारंभ आयडियल कॉलनी मधील मेट्रो सिटी स्पोर्ट्स क्लब येथे पार पडला. हे पुरस्कार शिवसेना (उबाठा) गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच यावेळी प्लेटलेट डोनेट विषयी जनजागृती व्हावी या हेतूने दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये डॉ. जितेंद्र सप्रे, डॉ. उपेंद्र साठे आणि डॉ. सुषमा साठे यांनी सहभाग घेतला होता.
‘प्लेटलेट डोनेट करणाऱ्या या दोन तरुणांकडून इतर तरुणांनी खूप काही शिकण्यासारखे आहे. मला खात्री आहे आज दोन तरुणांचा सत्कार होत आहे. पुढीलवर्षी दोनशे तरुणांचा सत्कार समारंभ पार पडणार. तरुणांमध्ये सामाजिक सेवेचे हे वेड पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. प्लेटलेटचे खरे महत्व आम्हाला करोना काळात समजले. हे कार्य अनेकांचे जीवन वाचवू शकते.’ असे बोलून पृथ्वीराज सुतार यांनी उपस्थित तरुणांना सामाजिक कार्य करण्याचे आवाहन करून दोन तरुणांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. असा सत्कार सोहळा आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे देखील कौतुक केले.
मार्गदर्शन करताना डॉ. जितेंद्र सप्रे म्हणाले कि, ‘रक्तदान आणि प्लेटलेट दान करण्याविषयी समाजात आजही अनेक गैरसमज दिसून येतात. प्लेटलेट दान कल्याने कोणतेही शारीरिक नुकसान होत नसून दान करणाऱ्याला निरोगी राहण्यासाठी त्याचा फायदाच होतो.’
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी एस एच इंटरप्राइजेसचे समीर हंपी, मनस्वी ॲडव्हर्टायझिंगचे गणेश भोसले, नाट्यरंजनचे दिपक गुप्ते, अमर थिएटरचे अमर काळे, मेलडी मोनार्चचे राजेंद्र दीक्षित व स्वरालयचे अभिजीत आपटे यांचे विशेष सहकार्य लाभले. अशी माहिती प्रमुख आयोजक राजेश्वरी प्रॉडक्शनचे सत्यजीत धांडेकर यांनी दिली.
यावेळी उपस्थितांसाठी सांगीतिक मैफिलीचे आयोजन करण्यातआले होते. सर्व गायकांचा सत्कार देखील करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मानसी आरकडी यांनी केले.
सर्व उपस्थितांचे गणेश भोसले यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed