फॅमच्या कार्यकारिणीवर “विशेष आमंत्रित” म्हणून चेंबरचे माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांची नियुक्ती

0
फॅमच्या कार्यकारिणीवर “विशेष आमंत्रित” म्हणून चेंबरचे माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांची नियुक्ती

पुणे , ता. 11 : दि पूना मर्चेंटस् चेंबरचे माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांची फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फॅम) या शिखर संस्थेच्या कार्यकारिणीवर “विशेष आमंत्रित” म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र फॅमचे अध्यक्ष जितेंद्र शहा यांनी दिले आहे.

राजेंद्र बाठिया हे गेली अनेक वर्षे चेंबरमध्ये कार्यरत असून त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. त्यांनी जितो फूड बँकेचे माध्यमातून अनेक गोरगरीब समाज बांधवांना मदत केली आहे. सध्या ते विविध संस्थांच्या उच्च पदावर काम करीत असून नुकतेच त्यांना “लीजेंड ऑफ महाराष्ट्र” या पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे. अशी माहिती दि पूना मर्चेंटस् चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed