शंकरबाबा महाराज यांस आकर्षक पुष्पमय विठ्ठल मुकुट परिधान

धनकवडी, दि. १४: कार्तिक एकादशी निमित्ताने श्री सदगुरू संतवर्य श्री शंकरबाबा महाराज यांना श्री सदगुरु शंकर महाराज अन्नछत्र समिती (ट्रस्ट) धनकवडी यांच्या वतीने अन्नछत्र येथील शंकरबाबा महाराज यांस आकर्षकमय फुलांचा विठ्ठल मुकुट परिधान करून कार्तिक एकादशी दिन सोहळा संपन्न करण्यात आला.अन्नछत्र समिती (ट्रस्ट) धनकवडी पुणेच्या वतीने सदगुरु शंकर महाराज यांस (मूर्तीस) फुलांची आकर्षक, मनमोहक सजावट केलेला “पुष्पमय विठ्ठलरूपी मुकुट” परिधान करीत सदगुरु शंकर महाराज यांस अभिषेक, पोशाख, शेला-उपरणे, तुळशीहार, अशी सेवा समर्पित करून सर्व भाविक भक्तांच्या उपस्थित आरती करून कार्तिक एकादशी हा सोहळा संपन्न करण्यात आला. यावेळी भक्तगण मोठ्या प्रमाणावर होते. अशी माहिती “श्री सदगुरु शंकर महाराज अन्नछत्र समिती (ट्रस्ट) धनकवडी पुणे” चे अध्यक्ष श्री. राजाभाऊ रेवडे आणि प्रसिद्धी प्रमुख सुहास रानवडे-पाटील यांनी दिली.