लोकशाहीचा उत्सव- १०४ वर्षीय चंद्रभान पुणमचंद भन्साळी यांचे प्रेरणादायी मतदान..!

0
लोकशाहीचा उत्सव- १०४ वर्षीय चंद्रभान पुणमचंद भन्साळी यांचे प्रेरणादायी मतदान..!

लोकशाहीच्या मजबुतीसाठी प्रेरणादायी कार्य

पुणे दि. १५: गंगाधाम परिसरातील १०४ वर्षीय ज्येष्ठ नागरिक चंद्रभान पुणमचंद भन्साळी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी आपला मतदानाचा हक्क बजावून सर्वांसाठी विशेषतः ज्यांना विशेष काही अडचण नसताना देखील मतदान करत नाहीत. आपला हक्क आणि कर्तव्य बजावत नाहीत. अश्या नागरिकांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. मतदान केल्यानंतर चंद्रभान पुणमचंद भन्साळी यांनी सरकारचे आणि निवडणूक आयोगाचे मनापासून आभार मानले. यावेळी ते म्हणाले कि, ‘८५ वर्षांच्या वयानंतर ज्येष्ठ नागरिकांना तब्येतीची काळजी घेत घरबसल्या मतदानाचा हक्क बजावता यावा. यासाठी घरी येऊन मतदानाची विशेष सुविधा प्रदान केली गेली. हे सरकारचे धोरण मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी फारच उपयुक्त ठरणार आहे.’ त्यावेळी त्यांनी लोकशाही भारतातील सर्व नागरिकांनी तसेच जेष्ठ नागरिकांनी या सुविधेचा वापर करून आपला मतदानाचा आपला हक्क बजावला पाहिजे. असे आवाहन देखील केले.
चंद्रभान भन्साळी यांचे सुपुत्र अनिल भन्साळी यांनी याबाबतची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली.
या प्रसंगी माजी नगरसेवक प्रविण चोरबेले, प्रविण भन्साळी, पुष्पा भन्साळी, अनिल भन्साळी, अल्पेश भन्साळी, एकता भन्साळी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed