एकता मित्र मंडळ (ट्रस्ट)चा गणेश जन्म सोहळा आनंदात.अनोख्या पद्धतीने गणेश जयंती साजरी

पुणे- तावरे कॉलनी, अरण्येश्वर येथील एकता मित्र मंडळ (ट्रस्ट) नेहमीप्रमाणे काहीतरी नवीन पद्धतीने समारंभ साजरा करण्याची परंपरा राखत गणेश जन्म सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी महिलांनाही सर्वांसोबत सन्मानाने वावरण्यासाठी सामाजिक प्रबोधनात एक पाऊल पुढे पडावे म्हणून “अभया” महिलांच्या हस्ते श्री गणेश याग संपन्न करण्यात आला.
गणेश जन्माचे औचित्य साधून वस्तीतील सर्व “अभया” व महिला मंडळाचा हस्ते गणेश पूजन व गणेश याग करण्यात आला. विधीवत गणेश पूजन, आरती, नवग्रह पूजा पार पडली. महिलांनी बनवलेले मोदक, तीर्थ, प्रसाद सर्वांना देण्यात आले.
त्याचप्रमाणे सामाजिक भान राखत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने यावेळी निराधार मुलांना आधार देणाऱ्या कात्रज येथील ममता फाऊंडेशन मध्ये जाऊन सर्व मुलांना दुपारचे जेवण अर्थात गणेश जन्म महाप्रसाद मंडळातर्फे देण्यात आला. त्यासोबत आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात आले.
मंडळाचे अध्यक्ष सुधीर ढमाले यावेळी म्हणाले कि, ‘यानिमित्त मुलांसोबत काही आनंदाचे क्षण घालविले. त्यांच्यासोबत छान गप्पा-गोष्टी करत श्री गणेशाची महती सांगत अथर्वशीर्षाचे रोज पठण करण्यासाठी आवाहन केले. मुलांच्या चेहऱ्यावरचा हास्य व आनंद आम्हा कार्यकर्त्यांना मोठे समाधान देऊन गेला.’
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश मांढरे, जयेश ढमाले, शुभम बाणखेले, हिरेन गायकवाड, अथर्व तिवाटणे, शुभम खाडे, आदिनाथ नाईक, वेदांत ताटे, दादू शिंदे यांनी सहभाग घेतला होता.