श्री गणेश तरुण मंडळाचा गणेश जयंती निमित्त अखंड हरीनाम सप्ताह संपन्न; सप्ताह संपन्न दिवशी महाप्रसाद भंडाराचे आयोजन.

बिबवेवाडी- कै. सौ. शांताबाई चंद्रभान भन्साळी यांच्या स्मरणार्थ गणेश जयंती निमित्त गुरुवारी ह.भ.प. माऊली जंगले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरीनाम सप्ताह संपन्न झाला. २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी सदर संपूर्ण सप्ताहामध्ये परिसरातील विविध महाराजांचे समाज प्रबोधन प्रवचन तसेच विविध भजनी मंडळांचे भजनाचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मंडळा तर्फे करण्यात आले होते.
सप्ताह संपन्न गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी होम हवन, दुपारी ह.भ.प. माऊली जंगले महाराज यांचे कीर्तन तसेच संध्याकाळी गणपती बप्पाची मिरवणूक त्यानंतर महाआरती झाल्यावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
सदर सप्ताहा निमित्त आयोजित कार्यक्रमात राज्यमंत्री माधुरी मिसाळ, दीपक मिसाळ, प्रविण चोरबेले, मनिषा चोरबेले, मनोज देशपांडे, मानसी देशपांडे, प्रवीण भन्साळी, विकास मुंदडा, अल्पेश भन्साळी, मल्लेश घुगरी, जयराम घाड़गे, संजय महामुनी, श्रीकांत दोडमने, दिलीप कर्णावट, मयुर कोठारी, पुष्पा भन्साळी, एकता भन्साळी आदी उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की,
“मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे योग्य नियोजन हेच धार्मिक कार्यक्रमांचे यश असते. बिबवेवाडी परिसरात गणेश जयंती निमित्त अखंड हरीनाम सप्ताह कार्यक्रम गेली पंधरा ते वीस वर्षापासून साजरा केला जातो. धार्मिक वातावरण व योग्य नियोजनामुळे मोठ्या संख्येने भाविक येथे भेट देतात. श्री गणेश तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते करत असलेले काम अतिशय स्तुत्य आहे.”
सप्ताहाचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मंडळाचे संस्थापक श्रीपाल मेहता, विश्वस्त अनिल भन्साळी, मंडळाचे आधार स्तंभ विकास मुंदडा, अध्यक्ष प्रितम नागापूरे, खजिनदार मल्लेश घुगरी व मंडळाचे कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला होता.